क्रीडा

ऋषभ पंत पुनरागमनासाठी सज्ज

Swapnil S

नवी दिल्ली : कार अपघातानंतर प्रदीर्घ काळ क्रिकेटपासून दूर राहिलेल्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या पुनरागमनाची प्रतीक्षा इंडियन प्रीमियर लीगपासून (आयपीएल) संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अपघातानंतर पायावरील शस्त्रक्रिया, नंतरचे उपचार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील पुनर्वसन कार्यक्रमानंतर पंतने मैदानावर उतरायला सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अंतर्गत चाचणी सामन्यात पंतला खेळवून त्याच्या उपलब्धतेबाबत चाचपणी केली होती. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक असलेल्या सौरभ गांगुलीने राष्ट्रीय अकादमीकडून पंतच्या पुनरागमनासाठी अधिकृत मान्यता मिळू शकेल, असे सांगून चाहत्यांना दिलासा दिला आहे. २६ वर्षीय पंतचा डिसेंबर २०२२मध्ये अपघात झाला होता. त्यानंतर तो आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. पंतने आयपीएलमध्ये चमक दाखवल्यास तो आगामी टी-२० विश्वचषकासाठी पुन्हा संघात स्थान मिळवू शकतो.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त