क्रीडा

रॉजर फेडरर कारकिर्दीमधला अंतिम सामना हरला पण...

मात्र हरल्यानंतरही रॉजर फेडररने अनेक क्रीडाप्रेमींची मने जिंकली. फेडररला निरोप देताना टेनिस कोर्टवर उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू

वृत्तसंस्था

टेनिस जगतातील अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररने आज टेनिस कोर्टचा निरोप घेतला. फेडररने शेवटचा सामना लेव्हर कप कोर्टवर खेळला. रॉजर फेडररने आपल्या कारकिर्दीत पुरुष एकेरीत अनेक विजेतेपदे जिंकली. पुरुष एकेरीत या बेताज बादशाहने दुहेरीत शेवटचा सामना खेळला. या सामन्यात स्पेनचा राफेल नदाल त्याचा जोडीदार होता.

गेल्या सामन्याचा निकाल रॉजर फेडररसाठी अनुकूल नव्हता. त्याचा पराभव झाला. मात्र हरल्यानंतरही रॉजर फेडररने अनेक क्रीडाप्रेमींची मने जिंकली. फेडररला निरोप देताना टेनिस कोर्टवर उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रॉजरचा खेळणारा साथीदार नदालही यावेळी रडला. याशिवाय जोकोविच, मरे आणि इतर खेळाडूंच्याही या भावनिक क्षणात त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

20 ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा रॉजर फेडरर शेवटचा सामना जॅक सॉक आणि फ्रान्सिस टियाफोविरुद्ध खेळला होता. फेडरर, राफेल नदाल जोडीने पहिला सेट 6-4 असा जिंकला. फेडरर आणि नदाल यांच्यात कोर्टवर चांगलीच जुंपली होती. मात्र दुसऱ्या सेटमध्ये जॅक-फॅन्सेसने जोरदार पुनरागमन केले. त्यांनी दुसरा सेट 6-7 असा जिंकला.

जॅक-फ्रान्सेस जोडीने तिसरा सेट 9-11 असा जिंकला. रॉजर फेडररला अंतिम सामना जिंकताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. पण तसे झाले नाही. फेडरर हा सामना हरला. पण त्याने तमाम टेनिसप्रेमींची मने जिंकली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत