बंगळुरू : आगामी आशिया चषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि टी-२० संघाचा उपकर्णधार शुभमन गिल, माजी कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे फिटनेस चाचणीसाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलंसमध्ये दाखल झाला.
आयोजक युएई विरुद्ध ९ सप्टेंबरला होणाऱ्या लढतीने भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यासाठी भारतीय संघातील खेळाडू ४ सप्टेंबरला दुबई येथे रवाना होणार आहे.
ही चाचणी रविवार पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेला रोहित नव्या हंगामाकडे कसे पाहतो याची उत्सुकता ताणली आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल आणि शार्दुल ठाकूरही अनिवार्य तंदुरुस्तीच्या चाचणीसाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलंसमध्ये येणार आहेत.
३८ वर्षीय रोहित ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.