डॉ. कर्णी सिंह नेमबाजी रेंजमध्ये झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणीत रविवारी रेल्वेच्या रुचिता विनेरकरने महिलांच्या १० मीटर एयर पिस्टल टी-५ स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. तिने कर्नाटकच्या दिव्या टीएस हिला १६-१४ असे नमविले.
टॉप आठ सेमीफायनल्सच्या टप्प्यात रुचिताने २५१.१ स्कोअर केला, तर दिव्याने २४८.७ गुण मिळविले.
रुचिता पात्रता फेरीत ५७६ स्कोअरसह चौथ्या स्थानावर राहिली होती. दिव्या ५७४ गुणांसह सातव्या स्थानावर राहिली होती. महाराष्ट्राची साक्षी सूर्यवंशी ५८० गुणांसह अव्वल राहिली होती.
दरम्यान, हरियाणाने ज्युनिअर महिला टी-५ दहा मीटर एयर पिस्टल स्पर्धेत पहिले दोन्ही क्रमांक पटकाविले. सुरूचीने रिदम सांगवानला अंतिम फेरीत १७-१५ असे नमविले.
सुरूची पात्रता फेरीत ५६८ गुणांसह सातव्या आणि रिदम ५७९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती.
युवा महिला १० मीटर एयर पिस्टल टी-५ गटात हरियाणाने सुवर्णपदक पटकाविले. शिखा नरवालने चंडीगढच्या साइनयामला १७-९ असे पराभूत केले.