क्रीडा

Sachin Tendulkar : सचिनच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त एमसीएने देणार 'हे' गिफ्ट

प्रतिनिधी

गेली अनेक दशके फक्त भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही आपली वेगळी छाप सोडणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा २४ एप्रिलला ५०वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मोठी घोषणा केली आहे. एमसीएकडून सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा वानखेडे स्टेडियमवर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या पुतळ्याचे अनावरण २४ एप्रिलला करणार असल्याचेही सांगितले आहे.

सचिनचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर कुठे बसवण्यात यावा?, याची जागा खुद्द सचिनने निश्चित केली आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी अंजली तेंडुलकरदेखील वानखेडे स्टेडियमवर पोहचले होते. तसेच, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेदेखील उपस्थित होते. "माझ्यासाठी ही एक सुखद भेट आहे. मला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. स्वतःच्याच पुतळ्याबाबत ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला." अशा भावना यावेळी सचिनने व्यक्त केल्या. तो म्हणाला की, "माझी कारकीर्द वानखेडेच्या मैदनावरच सुरू झाली. या मैदानासोबतच्या माझ्या कधीही न विसरल्या जाणाऱ्या आठवणी आहेत. तर, माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण २०११मध्ये याच मैदानावर अनुभवला होता. आपल्या भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता." असे म्हणत तो भावुक झाला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त