क्रीडा

Sanju Samson : रिषभ पंत फेल, तरीही संजू सॅमसनला संघात नो एंट्री; चाहत्यांनी बीसीसीआयवर ओढले ताशेरे

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाने एकदिवसीय (IND vs NZ ODI) मालिका गमावल्यानंतर आता बीसीसीआयवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रतिनिधी

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका १-० अशी गमावली. न्यूझीलंडने पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे भारतीय संघाला विजयाची संधीच मिळाली नाही. परंतु, या दरम्यान एक मुद्दा सतत चर्चेत राहिला, तो म्हणजे भारतीय संघामध्ये संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी न देणे. त्याऐवजी निवड करण्यात आलेल्या रिषभ पंतला साजेशी कामगिरी करता येत नसल्याने बीसीसीआयच्या निवडीवर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. सोशल मीडियावर वी वॉन्ट संजू ट्रेंड होऊ लागल्यानंतर यावर जास्त चर्चा झाली.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजूला फक्त पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली. त्यातही त्याने ३६ धावांची खेळी केली. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याचा समावेश केला नाही. यावरून सोशल मीडियावर संघनिवडीबाबतीत कर्णधार शिखर धवन आणि बीसीसीआय निवड समितीला कारणीभूत धरण्यात आले. एका युझरने म्हंटले की, संजूला वारंवार दुर्लक्षित केले जात आहे. रिषभ पंतला जर संधी मिळू शकते, मग संजूला का नाही?

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस