"मला नवं आयुष्य..."; IPL लिलावात CSK ने खरेदी केल्यानंतर सर्फराज खानने पोस्ट केला भावूक व्हिडिओ Photo- X
क्रीडा

"मला नवं आयुष्य..."; IPL लिलावात CSK ने खरेदी केल्यानंतर सर्फराज खानने पोस्ट केला भावूक व्हिडिओ

मिनी ऑक्शनच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर अखेर भारतीय फलंदाज सर्फराज खानचं नशीब उजळलं. लिलावाच्या दुसऱ्या फेरीत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने ७५ लाख रुपये खर्च करत त्याला संघात सामील केले. त्यानंतर सर्फराजने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली.

Krantee V. Kale

आयपीएलच्या मागील दोन हंगामात संधी न मिळाल्यानंतर तसेच मंगळवारी (दि.१६) अबु धाबी येथे झालेल्या मिनी ऑक्शनच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर अखेर भारतीय फलंदाज सर्फराज खानचं नशीब उजळलं. लिलावाच्या दुसऱ्या फेरीत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने ७५ लाख रुपये खर्च करत त्याला संघात सामील केले. त्यानंतर सर्फराजने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. आयपीएल करिअरला “नवजीवन” मिळाल्याचे सांगितले. सर्फराजने आयपीएलचा शेवटचा सामना २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला होता.

थँक्यू सो मच CSK...

दोन वर्षाच्या संघर्षानंतर आयपीएलमध्ये पुन्हा एकदा संधी मिळाल्यानंतर सर्फराज खान भावूक झाला. त्याने इंस्टाग्रामवर 'जर्सी' सिनेमातील एक भावूक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यावर “मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद सीएसके" असे लिहिले आहे.

SMAT मध्ये सर्फराजचा जबरदस्त फॉर्म

सध्या सुरू असलेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. लिलावापूर्वी काही तास आधीच सर्फराजने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एका सामन्यात फक्त २२ चेंडूंमध्ये ७३ धावांची तुफानी खेळी खेळली होती. त्याने आतापर्यंत, ६ डावांत १८२.८५ स्ट्राईक रेटने २५६ धावा केल्या आहेत.

सीएसकेनेही इतिहास रचला

या मिनी-लिलावात सीएसकेनेही इतिहास रचला. चेन्नईने अनपेक्षितपणे अनकॅप्ड खेळाडूंवर लावलेली बोली दिवसाचे वैशिष्ट ठरली. अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर यांना फ्रँचायझीने प्रत्येकी १४.२० कोटींना खरेदी केले, ज्यामुळे ते आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू बनले. प्रशांतला संघात आणून चेन्नईने एकप्रकारे रवींद्र जडेजाची जागा भरून काढली. गेल्या महिन्यात सर्व संघांना आपल्याकडे कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. त्यावेळी चेन्नईने ट्रेड विंडोद्वारे (खेळाडूंची अदलाबदल) संजू सॅमसनला संघात आणताना रवींद्र जडेजा व सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवले होते. याशिवाय, सीएसकेने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू अकील हुसेनलाही २ कोटी रुपयांना विकत घेतले.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर