क्रीडा

आयसीसी पुरस्कार जिंकणारी 'ही' ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

हरमनप्रीतने इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक टी-20 मालिकेनंतर वन-डे मालिकेत सर्वाधिक २२१ धावा केल्या

वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार हरमनप्रीत कौरला जाहीर केला आहे. ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अॅवार्ड’ पटकाविणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.

या पुरस्कारासाठी भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा सामना भारताच्याच स्मृती मानधना आणि बांगलादेशची निगार सुलताना यांच्याशी होता. निवडलेल्या तीनही खेळाडूंनी अलीकडच्या काळात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या हरमनप्रीत आणि स्मृती यांनी गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या वन-डे आणि टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली. भारताने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका गमावली, पण वन-डे मालिकेत इंग्लंडला पराभू्त केले.

हरमनप्रीतने इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक टी-20 मालिकेनंतर वन-डे मालिकेत सर्वाधिक २२१ धावा केल्या. तिने पहिल्या सामन्यात नाबाद ७४ आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद १४३ धावा केल्या. भारताने १९९९ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये पहिली वन-डे मालिका जिंकली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी