क्रीडा

शोएब मलिकच्या ‘तिसऱ्या लग्नाची गोष्ट’, पाकिस्तानच्या सना जावेदशी केला ‘निकाह’

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच, आता शोएब मलिकने तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.

Swapnil S

लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच, आता शोएब मलिकने तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यामुळे शोएब आणि सानिया यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसऱ्यांदा निकाह केला आहे.

शोएबने २००२मध्ये व्यवसायाने शिक्षिका असलेल्या आएशा सिद्दीकी हिच्याशी लग्न केले होते. मात्र काही वर्षांनंतर तलाक घेत हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचे लग्न १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये झाले होते, तेव्हा भारतात या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. २०१८मध्ये त्यांना एक मुलगाही झाला होता, त्याचे नाव इजहान नावाचा एक मुलगाही झाला होता. पण कोरोनानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता, तेव्हापासून ते दोघेही वेगळे राहत होते.

आता शोएबने शनिवारी तिसऱ्या लग्नाची जाहीर कबुली दिली आहे. ३० वर्षीय सना जावेद ही पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अगदी लहान वयात तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत करिअरला सुरुवात केली होती. शोएब आणि सनाने काही जाहिरातींच्या शूटसाठी एकत्र काम केले होते. यादरम्यान त्यांची मैत्री होऊन पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शोएब-सनामध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर आहे. सना जावेदचे हे दुसरे लग्न असून तिने २०२० मध्ये गायक उमेर जसवालशी लग्न केले होते. पण सना-उमेरचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अलीकडे शोएब मलिक आणि सना जावेद डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण शोएबने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर या केवळ अफवा नव्हत्या, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव