क्रीडा

ICC T20 World Cup 2026 : श्रीलंकेविरुद्ध झिम्बाब्वे धुरंधर; विजयाचा शिल्पकार सिकंदर

कर्णधार सिकंदर रझा (२६ चेंडूंत ४५ धावा) गुरुवारी झिम्बाब्वेसाठी धुरंधर ठरला. त्यामुळे टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेने यजमान श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत अखेरच्या साखळी सामन्यात ६ गडी व ३ चेंडू राखून पराभूत केले.

Swapnil S

कोलंबो : कर्णधार सिकंदर रझा (२६ चेंडूंत ४५ धावा) गुरुवारी झिम्बाब्वेसाठी धुरंधर ठरला. त्यामुळे टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेने यजमान श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत अखेरच्या साखळी सामन्यात ६ गडी व ३ चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह झिम्बाब्वेने ब-गटातून अग्रस्थानासह सुपर-आठ फेरीत प्रवेश करून अन्य संघांना इशारा दिला आहे.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ७ बाद १७८ धावा केल्या. गेल्या लढतीतील शतकवीर पथुम निसांकाने यावेळी अर्धशतक साकारताना ४१ चेंडूंत ६२ धावा केल्या. पवन रत्नायकेने ४४, तर कुशल परेराने २२ धावांचे योगदान दिले. ब्लेसिंग मुझराबानीने २ बळी मिळवले.

त्यानंतर झिम्बाब्वेने सलामीवीर ब्रायन बेनेट (४८ चेंडूंत नाबाद ६३) आणि सिकंदर यांच्या फटकेबाजीमुळे १९.३ षटकांत १७९ धावांचे लक्ष्य गाठले. मारुमनी (३४), रायन बर्ल (२३) यांनीही मोलाचे योगदान दिले. ब्रायन तर सलग तीन लढतींमध्ये नाबाद आहे. मात्र निर्णायक स्थितीत सिकंदरने २ चौकार व ४ षटकार लगावून सामना झिम्बाब्वेच्या बाजूने झुकवला. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. टॉनी मुन्योंगाने ६ चेंडूंत ८ धावांची गरज असताना षटकार लगावला व नंतर विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

या विजयामुळे झिम्बाब्वेने ४ सामन्यांतील ७ गुणांसह गटात अव्वल क्रमांक मिळवला. झिम्बाब्वेने ओमान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका यांना धूळ चारली. तर आयर्लंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली. झिम्बाब्वेची सुपर-आठ फेरीत भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्याशी गाठ पडेल. श्रीलंकेनेसुद्धा आधीच आगेकूच केलेली असून ते सुपर-आठ फेरीत इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तानविरुद्ध खेळतील.

श्रीलंकेविरुद्ध झिम्बाब्वे धुरंधर; विजयाचा शिल्पकार सिकंदर

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : २० षटकांत ७ बाद १७८ (पथुम निसांका ६२, पवन रत्नायके ४४; ब्लेसिंग मुझराबानी २/३८) पराभूत वि.

झिम्बाब्वे : १९.३ षटकांत ४ बाद १८२ (ब्रायन बेनेट नाबाद ६३, सिकंदर रझा ४५; दुशान हेमंता २/३६)

केतनला कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

बंगळुरूत काळाचा घाला! दगडखाणीत ४० फुटांवरून कोसळला ग्रॅनाइटचा महाकाय खडक; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल

ठाण्याला पावसाने झोडपले; धरण क्षेत्रातही दमदार हजेरी