क्रीडा

महिलांच्या जागतिक क्रमवारीत भारताची स्मृती चौथ्या स्थानी

सांघिक क्रमवारीचा विचार करता एकदिवसीयमध्ये भारत चौथ्या, तर टी-२०मध्ये तिसऱ्या स्थानी आहे.

Sagar Sirsat

दुबई : भारतीय महिला संघाची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनाने मंगळवारी जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी आगेकूच केली. २७ वर्षीय स्मृतीने ६९६ गुणांसह चौथा क्रमांक पटकावला असून इंग्लंडची नॅट शीव्हर-ब्रंट, श्रीलंकेची चामरी अटापटू आणि ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर विराजमान आहेत. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर १०व्या स्थानी कायम आहे. गोलंदाजांमध्ये भारताच्या दीप्ती शर्माची तिसऱ्यावरून चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. अष्टपैलूंमध्ये ती पाचव्या क्रमांकावर आहे. टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृतीने चौथे स्थान कायम राखले आहे. सांघिक क्रमवारीचा विचार करता एकदिवसीयमध्ये भारत चौथ्या, तर टी-२०मध्ये तिसऱ्या स्थानी आहे. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलिया दोन्ही प्रकारांत अग्रस्थानी विराजमान आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास