पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात ऑस्ट्रेलियावर चार धावांनी विजय मिळवत मालिकेवर ३-१ ने कब्जा केला. ३० वर्षांनी कांगारूंवर मायदेशात विजय मिळविला. या सामन्यात फिरकीपटूंनी चक्क ५० पैकी ४३ षटके गोलंदाजी केली. मालिकेतील शेवटचा सामना २४ जून रोजी होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९ षटकांत २५८ धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला केवळ २५४ धावाच करता आल्या. धावाच करू शकले. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने आगळ्यावेगळ्या रणनीतीचा अवलंब केला. त्याने आपल्या फिरकीपटूंना डावातील ५० षटकांपैकी ४३ षटके टाकली. वेगवान गोलंदाजांनी केवळ सात षटके टाकली. एका डावात ४३ षटके फिरकीपटूंनी टाकण्याची एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील ही आठवी वेळ ठरली. अशी कामगिरी करणारा श्रीलंका हा एकमेव संघ ठरला. शनाकाची ही रणनीती यशस्वीही झाली. यजमानांनी हा सामना जिंकला.
श्रीलंकेने ३० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला मायदेशात वनडे मालिकेत पराभूत केले. याआधी त्यांनी ऑगस्ट १९९२ मध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती. त्यानंतर त्याने घरच्या मैदानावर सलग तीन एकदिवसीय मालिका गमावली आहे. कांगारू संघाने लंकेच्या भूमीवर २००४, २०११ आणि २०१६ मध्ये विजय मिळविला होता.
असलंकाचे शानदार
चरिथ असलंकाने सर्वाधिक ११० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धनंजय डी सिल्वाने ६० आणि वानिंदू हसरंगाने २१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श, पॅट कमिन्स, मॅथ्यू कुहेनमन यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. ग्लेन मॅक्सवेलने एक फलंदाज बाद केला.
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने ९९ धावा केल्या. वॉर्नरने ११२ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार लगावले. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३५, ट्रॅव्हिस हेडने २७ आणि मिचेल मार्शने २६ धावा केल्या. श्रीलंकेकडून धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने आणि जेफ्री वँडरसे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.