क्रीडा

स्वित्झर्लंडचा टेनिससम्राट रॉजर फेडरर निवृत्त! २४ वर्षांच्या अविस्मरणीय कारकीर्दीनंतर अलविदा

वृत्तसंस्था

आपल्या कलात्मक खेळाने भारतीयांसह जगभरातील असंख्य चाहत्यांची मने जिंकणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने गुरुवारी अखेर टेनिसला अलविदा केला. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या लेव्हर चषक टेनिस स्पर्धेत ४१ वर्षीय फेडरर अखेरचा सामना खेळणार आहे.

तब्बल २० ग्रँडस्लॅम नावावर असलेला फेडरर २०२१च्या विम्बल्डननंतर एकाही स्पर्धेत सहभागी झालेला नाही. त्याच्या गुडघ्यावर तिसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाल्यामुळे फेडररचे पुनरागमन सातत्याने लांबणीवर पडत होते. अखेर गुरुवारी फेडररने ट्विटरच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. विम्बल्डन २०२१मध्ये फेडररला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. १९९८ ते २०२२ या काळात फेडररने प्रामुख्याने हिरवळीवर वर्चस्व गाजवले. त्याने एकूण आठ वेळा विम्बल्डन, सहा वेळा ऑस्ट्रेलियन, पाच वेळा अमेरिकन तर एकदा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. यंदा विम्बल्डनच्या सेंटर कोर्टला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फेडररला खास आमंत्रण देण्यात आले होते. त्याच्या निवृत्तीमुळे असंख्य भारतीयांची मनेही दुखावली असून फेडररसारखा टेनिसपटू पुन्हा घडणार नाही, हे खरं.

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये

शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी

नाशिकमधून शिंदेंची वेगळी खेळी! थेट शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी, गोडसेंना धक्का