संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

टीम इंडियाचे घरच्या मैदानावरील वेळापत्रक जाहीर; कोणते संघ येणार भारताच्या दौऱ्यावर?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघासाठी घरच्या मैदानातील कार्यक्रमपत्रिका जाहीर केली.

Swapnil S

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघासाठी घरच्या मैदानातील कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. त्यानुसार वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

२ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेने घरच्या हंगामाला प्रारंभ होईल. ही कसोटी अहमदाबादला होईल. त्यानंतर १० ऑक्टोबरपासून कोलकाता येथे दुसरी कसोटी रंगेल. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून ३ एकदिवसीय सामन्यांची, तर २९ ऑक्टोबरपासून ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल. गतवर्षी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली. त्यामुळे आता या दौऱ्यात फक्त टी-२० व एकदिवसीय मालिका होतील.

ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यावर भारतीय संघ मायदेशी परतेल. मग १४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ तिन्ही प्रकारच्या मालिका खेळणार आहे. १४ ते १८ व २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान भारत-आफ्रिकेत दोन कसोटी सामने होतील. त्यानंतर ३० नोव्हेंबरपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल. ९ डिसेंबरपासून ५ टी-२० सामने खेळवण्यात येतील.

यंदा गुवाहाटी, लखनऊ, रायपूर, रांची अशा ठिकाणी भारताच्या लढती होतील. आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी गुवाहाटी येथे होईल. गुवाहाटी हे भारतातील कसोटी सामना आयोजित करणारे ३०वे ठिकाण ठरणार आहे. मुंबई, पुणे येथे मात्र यंदाच्या हंगामात एकही आंतरराष्ट्रीय लढत होणार आहे. ऑक्टोबरमध्ये महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात रंगणार आहे. त्या स्पर्धेत काही सामन्यांचे आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर करण्यात येऊ शकते, असे समजते.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य