क्रीडा

IND vs NZ ODI: भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध सलग ५वा पराभव; पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभूत

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धचा (IND vs NZ ODI) पहिलाच एकदिवसीय सामन्यात हात पत्करावी लागली. एवढंच नव्हे तर हा त्यांच्याविरुद्धचा सलग ५वा पराभव ठरला

प्रतिनिधी

भारतीय संघाची एकदिवसीय सामन्यांत (IND vs NZ ODI) पराभवाची मालिका कायम आहे. शुक्रवारी ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागली आहे. तीन सामान्यांच्या मालिकेत आता न्यूझीलंडला १-० अशी आघाडी मिळाली आहे. एवढंच नव्हे तर २०१९च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा हा सलग पाचवा पराभव आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ विकेट्स गमावून ३०६ धावांचे लक्ष उभे केले. यामध्ये शिखर धवनने ७२, शुभमन गिलने ५० तर श्रेयस अय्यरने सर्वाधिक ८० धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठणे न्यूझीलंडला शक्य होईल का? असे वाटत असतानाच त्यांनी भारतीय गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि हे लक्ष सहजरित्या पार केले.

न्यूझीलंडने ७ विकेट्स राखून अवघ्या ४७.१ षटकांमध्ये हे लक्ष्य पार केले. यावेळी न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने १४५ धाव केल्या. तर कर्णधार केन विल्यमसनने ९४ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. एकदिवसीय पदार्पण करणाऱ्या उमरान मलिकने २ विकेट्स घेतले तर शार्दूल ठाकूरने १ विकेट घेतली. अर्शदीप सिंग, चहल आणि वॉशिंग्टन सुंदरला एकही विकेट मिळाली नाही.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप