एक्स (@IndTennisDaily)
क्रीडा

सानिया, पेस, भूपती...तीन दिग्गज एका मंचावर; टेनिस प्रीमियर लीगसाठी पार पडला खेळाडूंचा लिलाव

टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या हंगामासाठी पार पडलेल्या खेळाडूंच्या लीलावात आठही संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले.

Swapnil S

मुंबई : टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या हंगामासाठी पार पडलेल्या खेळाडूंच्या लीलावात आठही संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये झालेल्या या लिलावाच्या निमित्ताने लिएंडर पेस, सानिया मिर्झा आणि महेश भूपती हे भारताचे तीन महान टेनिसपटू पुन्हा एका मंचावर आले. या सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, राकुलप्रीत सिंग यासुद्धा उपस्थित होत्या.

आर्मेनियाची २२ वर्षीय एलिना एव्हानेस्यान प्रथमच या स्पर्धेत खेळत असली तरी तिला ४२.२० लाख अशी सर्वोच्च किंमत देऊन प्रियेश जैन यांच्या मालकीच्या व तापसी पन्नूचा पाठिंबा असलेल्या पंजाब पॅट्रियट्स संघाने खरेदी केले. अन्य संघांकडून कडवी चुरस मिळाल्यानंतर पॅट्रियट्स संघाने सर्वाधिक बोली लावून क्रमवारीत ४७व्या स्थानी असलेल्या एलिनाला महिला गटातील डायमंड श्रेणीतून मिळवले. पॅट्रियट्स संघाने पुरुष गटातील प्लॅटिनम श्रेणीतील अर्जुन कढेला ५ लाख या मूळ किमतीला करारबद्ध केले.

४ फेऱ्यांच्या अत्यंत चुरशीच्या लिलावानंतर सर्व संघांनी स्पर्धात्मक बोली लावून जगभरातील गुणवान खेळाडूंमध्ये आपला संघ निवडला. गतविजेत्या बंगळुरू एसजी पायपर्स संघाने दुसऱ्या क्रमांकाच्या महागड्या खेळाडूची खरेदी करताना ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेलला ४२ लाखांत खरेदी केले. सानिया मिर्झाच्या बंगाल विझार्ड्स संघाने पेटा मॅट्रिकला ३५ लाखांत सहभागी केले. अनुभवी रोहन बोपण्णा व पेस दिल्लीकडून खेळताना दिसतील.

गुजरात पँथर्सने सुमित नागलसाठी ३५ लाख मोजले. तसेच मुंबई ईगल्सने जॅकलिन क्रिस्टीला संघात सहभागी केले. टेनिस प्रीमियर लीग ३ ते ८ डिसेंबर दरम्यान मुंबई येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) टेनिस संकुलात पार पडणार आहे.

फलटण : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी प्रशांत बनकर अटकेत, पोलिस उपनिरीक्षक अजूनही फरार

माथेरानमध्ये दिवाळीचा पर्यटन सीझन ठरला ‘फ्लॉप’; घाट मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन ढिसाळ

७०६ झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करावा; मुंबई उच्च न्यायालयात वकिलाची याचिकेद्वारे मागणी

दिवाळीत ठाणे परिवहनचे दिवाळे; प्रवासी संख्येत झाली घट; चार दिवसांत तब्बल ३२ लाखांचे नुकसान

लग्न हा सज्ञान व्यक्तीच्या पसंतीचा मुद्दा; पित्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली