क्रीडा

भारताला ऑस्ट्रेलियाकडून व्हाइटवॉश

पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या दौऱ्यात भारताला पहिले चारही सामने गमवावे लागले होते. मात्र पाचव्या सामन्यात दमदार खेळ करूनही भारताच्या पदरी निराशा आली. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग (चौथ्या मिनिटाला) आणि बॉबी सिंग धामी (५३व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

Swapnil S

पर्थ : भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ०-५ असा व्हाइटवॉश पत्करावा लागला. पाचव्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून २-३ असा पराभूत झाला.

पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या दौऱ्यात भारताला पहिले चारही सामने गमवावे लागले होते. मात्र पाचव्या सामन्यात दमदार खेळ करूनही भारताच्या पदरी निराशा आली. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग (चौथ्या मिनिटाला) आणि बॉबी सिंग धामी (५३व्या मिनिटाला) यांनी गोल केले. ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हेवर्ड (२०व्या मिनिटाला), काय विलोट (३८व्या मिनिटाला आणि टिम ब्रँड (३९व्या मिनिटाला) यांनी गोल करत विजयात योगदान दिले.

भारताने आक्रमक खेळ करत सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. जुगराज सिंग याने जरमनप्रीत सिंग याच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या गोलक्षेत्रात मजल मारली, मात्र त्यावर त्यांना गोल करता आला नाही. मात्र चौथ्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलमुळे भारताने खाते उघडले. त्याचा हा या मालिकेतील तिसरा गोल ठरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने २०व्या मिनिटाला हेवर्डच्या गोलमुळे बरोबरी साधली. त्याचा हा या स्पर्धेतील सातवा गोल ठरला. भारताचा गोलरक्षक सुरज करकेरा याने ऑस्ट्रेलियाचे अनेक हल्ले परतवून लावले. मात्र तिसऱ्या सत्रात ३८व्या आणि ३९व्या मिनिटाला दोन गोल करत ऑस्ट्रेलियाने ३-१ अशी आघाडी घेतली.

४२व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, मात्र अमित रोहिदासने मारलेला फटका गोलपोस्टच्या बाजुने गेला. भारताने अखेरच्या सत्रात यजमानांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, त्याचाच फायदा ५३व्या मिनिटाला झाला. बॉबी सिंगच्या गोलमुळे भारताने पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला, पण भारताला अखेरपर्यंत लढतीत बरोबरी साधण्यात अपयश आले.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!