क्रीडा

भारतीय संघाला विश्वविक्रम खुणावतोय

वृत्तसंस्था

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला विश्वविक्रम खुणावत आहे. गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात यश संपादन केल्यास भारतीय संघ सलग १३ ट्वेन्टी-२० लढती जिंकण्याचा पराक्रम करू शकतो. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीकडे अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागले असून प्रामुख्याने अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकच्या पुनरागमनाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

भारत-आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होणार असून उभय संघांत नवी दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियमवर पहिली लढत खेळवण्यात येईल. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा या खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून के. एल. राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे मालिकेला मुकणार आहेत. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा विचार करता या मालिकेत पर्यायी खेळाडूंनी संधी देतील.

हार्दिक, कार्तिकची भूमिका कोणती?

ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सलामीला येण्याची शक्यता असून श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येईल; परंतु आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी सातत्याने वरच्या स्थानावर फलंदाजी करणारा हार्दिक आणि अखेरच्या षट्कांत हाणामारी करण्यात पटाईत असलेला कार्तिक यांना संघ व्यवस्थापन कोणत्या क्रमांकावर खेळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. द्रविडने हार्दिकला फिनिशर म्हणूनच खेळवण्याचे संकेत दिले आहेत. भुवनेश्वर कुमार भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याला हर्षल पटेल किंवा आवेश खानपैकी एकाची साथ लाभेल. यजुवेंद्र चहलच्या जोडीने रवी बिश्नोईला संधी मिळू शकते.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात आतापर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

Lok Sabha Elections 2024:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान; तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात!

पवार विरुद्ध पवार; पुण्यातील लढतीकडे देशाचे लक्ष

'मुंबई दंगली'प्रकरणी निर्देशांची अंमलबजावणी करा; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज अनेक भागांत पाणीकपात; वीजपुरवठा खंडित, जलशुद्धीकरण यंत्रणा ठप्प