क्रीडा

खो-खो लीगच्या पहिल्या पर्वासाठी लवकरच निवडप्रक्रिया सुरु होणार

ऋषिकेश बामणे

महाराष्ट्राच्या मातीतील खेळ म्हणून लोकप्रिय असलेला खो-खो आता जगभरातील चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाला आहे. पुरुषांच्या अल्टिमेट खो-खो लीगच्या पहिल्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव नव्हे, तर निवडप्रक्रिया १३ आणि १४ जुलै रोजी पुण्यातील बालेवाडी येथे होणार आहे. भारतीय खो-खो महासंघाचे (केकेएफआय) सरचिटणीस महेंद्रसिंह त्यागी यांनी १४ ऑगस्टपासून रंगणाऱ्या या स्पर्धेविषयी अधिकृत माहिती दिली.

२०१९मध्ये सर्वप्रथम अल्टिमेट लीगची संकल्पना मांडण्यात आली. परंतु तेव्हापासून असंख्य कारणांमुळे ही लीग लांबणीवर पडली. त्यानंतर कोरोनामुळे या लीगची प्रतीक्षा वाढत गेली. परंतु एप्रिलमध्ये महासंघाने ही लीग ऑगस्टमध्ये खेळवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आता पुढील आठवड्यात होणाऱ्या खेळाडूंच्या निवडप्रक्रियेकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच स्पर्धेचे प्रेक्षपण हक्क मिळवणाऱ्या सोनी क्रीडा वाहिनीने स्पर्धेची पहिली जाहिरात केली. मुंबई, राजस्थान, गुजरात, चेन्नई, तेलंगण आणि ओडिशा हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून मुंबईच्या संघाचे मालकी हक्क लोकप्रिय गायक बादशहा आणि उद्योजक पुनित बालन यांनी विकत घेतले आहेत.

“अल्टिमेट लीगच्या आयोजनाची तयारी जोरात सुरू आहे. पुढील आठवड्यात महासंघाचे पदाधिकारी तसेच संघमालकांच्या उपस्थितीत खेळाडूंची निवडप्रक्रिया पार पडेल. स्पर्धेचे अंतिम नियमसुद्धा ठरवण्यात आले असले तरी संघमालकांनी त्यांच्या संघाचे नाव जाहीर केल्यावर तसेच स्पर्धेचे वेळापत्रक ठरल्यावरच आम्ही नियमावली प्रसिद्ध करू,” असे त्यागी म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून खो-खो लीगच्या नियमांना महाराष्टातील काही आजी-माजी खेळाडू तसेच संघटकांकडून विरोध करण्यात येत आहे.

निवडप्रक्रियेचे स्वरूप

रोटेशन पॉलिसीनुसार संघमालक करणार खेळाडूंची निवड.

खेळाडूंची नावे कागदावर लिहून त्यांची चार गटात विभागणी होईल.

आघाडीचे खो-खोपटू पहिल्या विभागात (पूल-ए) असतील.

एका संघाला ५० लाख रुपयांमध्ये जास्तीत जास्त २० खेळाडू निवडण्याची मुभा.

पहिल्या विभागातील खेळाडूंना ५ लाख रुपये मिळण्याची शक्यता.

संघ आणि संघमालक

मुंबई : बादशहा, पुनित बालन

गुजरात : अदानी समुह

राजस्थान : कॅपरी ग्लोबल

तेलंगण : जीएमआर स्पोर्ट्स

चेन्नई : केएलओ स्पोर्ट्स

ओदिशा : ओदिशा सरकार

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?