क्रीडा

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा संघ विजयी

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत वरळी स्पोर्ट्स क्लबने एस. एस. ग्रुपवर २-१ असा निसटता विजय मिळविला

वृत्तसंस्था

स्काउट हॉल शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या इंडियन ऑइल व भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३०व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतर क्लब सांघिक गटात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग संघाने शिवतारा संघाचा २-१ पराभव करून विजयाला गवसणी घातली.

अमोल सावर्डेकरने मनोज कांबळेवर २१-६, २२-११ अशी सहज मात केली. तर ओंकार नेटकेने राहुल सोळंकीला २१-६, ०-२५, १५-१० असे हरविले. दुहेरीच्या सामन्यात शिवताराने एकमेव विजय मिळविला. त्यांच्या विवेक भारती व अतुल पेटकर जोडीने सुपेश कामतेकर व सम्राट मोहिते जोडीवर १४-१७, २५-०, २५-१७ असा अटीतटीच्या लढतीत विजय मिळविला.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत वरळी स्पोर्ट्स क्लबने एस. एस. ग्रुपवर २-१ असा निसटता विजय मिळविला. त्यांच्या सलमान खानने सुरज कुंभारला ६-२५, २५-१७, २५-१६ असे पराभूत केले. तर एस एस ग्रुपच्या कुणाल राऊतने नितीन परमारवर १४-१३, २२-५ अशी मात करत सामना बरोबरीत आणला होता.

परंतु दुहेरीच्या सामन्यात फ्रान्सिस फर्नांडिस आणि प्रकाश सोळंकी जोडीने हरेश्वर बेतवंशी व सिद्धांत वाडवलकर जोडीवर १७-१३, २०-२ मात करत वरळी स्पोर्ट्स क्लबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत