क्रीडा

'या' प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या कारला भीषण अपघात

नवशक्ती Web Desk

गेल्या वर्षी अखेरीस भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. तो दिल्लीहून देहराडूनला आपल्या राहत्या घरी आईला भेटालया चालला होता. यावेळी ही दुर्घटना घडली होती. या अपघातामुळे ऋषभ पंत काही महिन्यांपासून क्रिकेटपासून लांब आहे. तो मैदानावर कधी उतरणार याबाबत अजून कुठलीही स्पष्टता नाही. आता भारतीय संघाकडून खेळलेल्या आणखी एका क्रिकेटपटूच्या कारला भीषण अपघात झाला आहे. मंगळावीर हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

या क्रिकेटपटूच्या कारला अपघात झाला त्यावेळी त्याला मुलगा देखील कारमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज राहिलेला प्रवीण कुमराच्या कारला मंगळवारी अपघात झाला आहे. प्रवीण कुमार हा पांडव नगरहून परत येत होता. त्यावेळी हा अपघात झाला. एक टँकर प्रवीण कुमारच्या गाडीला धडकल्याने हा अपघात घडला. यावेळी प्रवीण कुमारच्या कारच खुप नुकसान झालं आहे. सुदैवाने यात प्रवीण कुमार तसंच त्याच्या मुलाचा जीव वाचला आहे. यात ते किरकोळ जखमी झाले आहेत.

प्रवीण कुमारच्या कारला धडकलेल्या टँकरला पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतलं आहे. प्रवीण कुमार हा मेरठच्या मुलतानमध्ये राहतो. त्याची कार रात्री पांडवनगरमधून जात असताना लँड रोव्हर कार टँकरला धडकली. सिव्हिल लाईन कमिश्नरी चौकात हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांनी टँकरच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. प्रवीण कुमारच्या ज्या कारचा अपघात झाला त्या कारची किंमत २.५० कोटी रुपये आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा