अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : अग्रमानांकित झ्वेरेव्ह यूएस ओपनचा राजा (Photo-X)
क्रीडा

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : अग्रमानांकित झ्वेरेव्ह यूएस ओपनचा राजा

अलेक्झांडर झ्वेरेव्हने रविवारी मध्यरात्री यूएस ओपनचा नवा राजा ठरला. अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या अग्रमानांकित झ्वेरेव्हने अमेरिकेच्या आठव्या मानांकित बेन शेल्टनचा ६-३, ७-६ (७-२), ५-७, ६-२ असा पराभव करत पुरुषांचे एकेरीचे विजेतेपद पटकावले.

Swapnil S

न्यूयॉर्क : अलेक्झांडर झ्वेरेव्हने रविवारी मध्यरात्री यूएस ओपनचा नवा राजा ठरला. अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या अग्रमानांकित झ्वेरेव्हने अमेरिकेच्या आठव्या मानांकित बेन शेल्टनचा ६-३, ७-६ (७-२), ५-७, ६-२ असा पराभव करत पुरुषांचे एकेरीचे विजेतेपद पटकावले. झ्वेरेव्हने यंदाच्या फ्रेंच ओपननंतर आपले दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले असून, २०२०च्या यूएस ओपनच्या अंतिम फेरीत हुकलेले विजेतेपद अखेर पटकावले.

ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच अव्वल मानांकन मिळालेल्या झ्वेरेव्हने शेल्टनच्या खराब सुरवातीचा फायदा घेतला. टायब्रेकरमध्ये उत्कृष्ट सर्व्हिस करत त्याने सामना स्वतःच्या बाजूने वळवला. “जवळपास ९९ टक्के प्रेक्षक बेनच्या बाजूने होते, त्याबद्दल मी माफी मागतो. परंतु येथे खेळण्यासाठी उत्तम वातावरण होते आणि प्रेक्षक नेहमीच खूप प्रामाणिक होते,” असे झ्वेरेव्ह म्हणाला. या विजयामुळे झ्वेरेव्हने यंदाच्या वर्षात ग्रँडस्लॅम सामन्यांमधील आपली कामगिरी २५-२ अशी सुधारली आहे. त्याला विजेतेपदासह ५.५ दशलक्ष डॉलरचे बक्षीस मिळाले असून, शनिवारी महिला विजेती एलिना रायबॅकिनाला मिळालेल्या बक्षिसाइतकीच ही रक्कम आहे.

शेल्टनने २००३ मध्ये अँडी रॉडिकनंतर यूएस ओपन जिंकणारा पहिला अमेरिकन पुरुष खेळाडू बनण्याचा आणि १९६८ मध्ये आर्थर ॲश यांच्यानंतर पुरुषांचे विजेतेपद जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला अपयश आले. “तू जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेस,” असे शेल्टनने सामन्यानंतर झ्वेरेव्हला सांगितले. यानिक सिनरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर झ्वेरेव्हला या स्पर्धेत अव्वल मानांकन मिळाले होते.

( इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण

Pune : जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊ रंगारी गणपती बाप्पा विराजमान; पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना

अधिष्ठाताच करणार पुनरावलोकन; कामकाजाच्या पुनरावलोकनासाठी वेगळी पद्धत, मुंबई महापालिकेचा नवा निर्णय