अमेरिकन ओपन : अल्कराझ पाच महिन्यांनी परतणार; सिनरची मात्र दुखापतीमुळे माघार 
क्रीडा

अमेरिकन ओपन : अल्कराझ पाच महिन्यांनी परतणार; सिनरची मात्र दुखापतीमुळे माघार

स्पेनचा तारांकित टेनिसपटू कार्लोस अल्कराझ तब्बल पाच महिन्यांनी पुन्हा कोर्टवर परतणार आहे. २३ वर्षीय अल्कराझ अमेरिकन ओपनचे विजेतेपद टिकवण्याच्या मोहिमेची सुरुवात रोमन सफियुलिनविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्याने करणार आहे. मात्र इटलीचा अग्रमानांकित यानिक सिनर गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेस मुकणार असल्याने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला अग्रमानांकन देण्यात आले आहे.

Swapnil S

न्यूयॉर्क : स्पेनचा तारांकित टेनिसपटू कार्लोस अल्कराझ तब्बल पाच महिन्यांनी पुन्हा कोर्टवर परतणार आहे. २३ वर्षीय अल्कराझ अमेरिकन ओपनचे विजेतेपद टिकवण्याच्या मोहिमेची सुरुवात रोमन सफियुलिनविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्याने करणार आहे. मात्र इटलीचा अग्रमानांकित यानिक सिनर गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेस मुकणार असल्याने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला अग्रमानांकन देण्यात आले आहे.

बराच काळ स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहिल्यानंतर अल्कराझला या सामन्यात आपल्या तंदुरुस्तीची तातडीने परीक्षा द्यावी लागणार आहे. उजव्या हाताच्या मनगटाच्या सुजेमुळे अल्कराझचा हा हंगाम विस्कळीत झाला होता. त्यामुळे त्याला रोलँड-गॅरोस येथील फ्रेंच ओपन आणि विम्बलडन या दोन्ही प्रमुख स्पर्धांना मुकावे लागले होते. १४ एप्रिलनंतर त्याने एकही सिंगल्सचा सामना खेळलेला नाही. नुकताच सेरेना व्हिलियम्ससोबत मिश्र दुहेरीत खेळून त्याने कोर्टवर हलके पुनरागमन केले असले, तरी आता अल्कराझला ग्रँड स्लॅम सिंगल्सच्या कठीण आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

दीर्घकाळ खेळापासून दूर राहूनही अल्कराझला न्यूयॉर्कमध्ये दुसरे मानांकन मिळाले आहे. जूनमध्ये फ्रेंच ओपन जिंकून कारकीर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम पटकावणारा झ्वेरेव्ह आपल्या मोहिमेची सुरुवात इटलीच्या लोरेन्झो सोनेगोविरुद्ध करणार आहे. पुरुष एकेरीच्या ड्रॉनुसार अल्कराझ आणि नोव्हाक जोकोव्हिच हे दोघे एकाच सत्रात आहेत. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू अंतिम चारमध्ये पोहोचल्यास उपांत्य फेरीत त्यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. जोकोव्हिच २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.

फेडररचा गौरव आणि दिग्गजांचा सामना

टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याची रोड्स आयलंडमधील न्यूपोर्ट येथे ‘आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडचा ४५ वर्षीय खेळाडू रॉजर फेडरर या शनिवारी या सन्मानाचा स्वीकार करणार असून, त्याच्यासह वृत्तसंपादक आणि माजी खेळाडू मेरी कॅरिलो यांचाही सन्मान केला जाणार आहे. शुक्रवारीदेखील फेडररचा विशेष सामना आयोजित करण्यात आला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत आजही १८४ कचऱ्याचे हाॅटस्पाॅट; २८६ कचराकुंडी हॉटस्पॉटपैकी १०२ ठिकाणे हटवली

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय

Thane: पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन; उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर कारवाई

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय