क्रीडा

Virat Kohli Birthday : विराटला सचिन तेंडुलकरचा क्रिकेट वारसदार का मानतात?

भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli Birthday) सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. त्यामुळेच विराटची तुलना ही अनेकदा सचिनशी केली जाते.

प्रतिनिधी

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा आज ३४वा वाढदिवस साजरा करत आहे (Virat Kohli Birthday). सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी २० स्पर्धेमध्ये तो उत्तम कामगिरी करत आहे. विराट कोहलीचे फक्त देशातच नव्हे तर विदेशातही अनेक चाहते आहेत. त्यामुळे अनेकवेळा देशाच्या या स्टार फलंदाजीची तुलना ही अनेकवेळा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी (Sachin Tendulkar) होते. असेच काही निवडक रेकॉर्ड्स ज्यांमध्ये विराटने सचिनला मागे टाकले आहे.

विराटने ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या आयसीसी टी २० स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध धमाकेदार फलंदाजी करत सचिनचा एक रेकॉर्ड मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक (३३५०) धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. याआधी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या (३३००) नावावर होता.

विराट कोहली हा नेहमीच एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आला आहे. त्याने भारताबाहेरील ११२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५६.५८च्या सरासरीने २० शतके आणि २५ अर्धशतकांसह ५२०६ धावा केल्या आहेत. त्याने सचिनला यामध्ये मागे टाकले. सचिनने १४७ सामन्यांमध्ये ३७.२४च्या सरासरीने १२ शतके आणि २४ अर्धशतकांसह ५०६५ धावा केल्या.

विराटने आत्तापर्यंत ३ एकदिवसीय विश्वचषक, पाच टी-२० विश्वचषक आणि तीन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळल्या आहेत. यामध्ये त्याने २४ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२,००० धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने २४२ इनिंग्समध्ये हा रेकॉर्ड पार केला. तर सचिनला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी ३०० इनिंग्स लागले होते. त्यानंतर पॉंटिंग (३१४), संगकारा (३३६) आणि सनथ जयसूर्या (३७९) यांचा क्रमांक लागतो.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : निवडणुकांमध्ये बाजी कोणाची? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

Thane : अवैध बांधकाम केल्यास नगरसेवक पद जाणार; निवडणुकीपूर्वी उमेदवारांना द्यावे लागणार शपथपत्र

आता टोल नाक्यांवर AI; जाता येणार ८०च्या वेगाने; थांबण्याची, ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी

महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणातील 'हेल्दी' संबंध संपले; भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची खंत

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण : पार्थ पवार यांच्या सहीचे बनावट पत्र व्हायरल; आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल