क्रीडा

टी-२० मालिकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्याची शक्यता

वृत्तसंस्था

आयपीएल २०२२ संपल्यानंतर भारतालाआफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची असून राहुल द्रविड यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. द्रविड हे अन्य मालिकांमध्ये व्यस्त राहणार असल्याने हा बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जून ते १९ जून दरम्यान टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधीच टीम इंडियाच्या कोचिंगची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिल्याच्या बातम्या येत येत आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी लक्ष्मणला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, असे,सांगण्यात येत आहे. भारताला २६ जून ते २८ जून दरम्यान आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायच्या आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड १५ किंवा १६ जून रोजी वरिष्ठ खेळाडूंच्या संघासह इंग्लंड दौऱ्यावर रवाना होऊ होणार आहेत. या दौऱ्यात भारताला एक कसोटी, तीन एकदिवसीय सामने आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. त्यामुळे राहुल द्रविड व्यस्त असणार आहे. द्रविड सर्व मालिकांसाठी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळेच व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन शिखर धवनकडे युवा टीम इंडियाचे कर्णधारपद सोपविले जाण्याचा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेत निवडकर्ते अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देणार असल्याचे कळते. के एल राहुल, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत हे खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणाऱ्या टीम इंडियाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह वरिष्ठ संघाचा भाग असतील, असे सांगण्यात येते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत