संग्रहित छायाचित्र एएनआय
क्रीडा

"गौतम गंभीर किंवा आशीष नेहरा कुणालाही प्रशिक्षक बनण्याची संधी मिळो, पण..." हरभजनने व्यक्त केले मत

Swapnil S

मुंबई : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी हा एक काटेरी मुकुट असतो. त्यामुळे कुणीही प्रशिक्षकपद स्वीकारले तरी चालेल. मात्र भारतीय संघासाठी काम चांगले करावे, असे मत माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने नोंदवले.

“गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार ही सध्या फक्त चर्चा आहे. खेळाडूंना एकत्र ठेवणे हे प्रशिक्षकाचे मोठे काम असते. त्यामुळे संघाची एकत्रित कामगिरी चांगली होत असते. गौतम काय किंवा आशीष नेहरा कुणालाही प्रशिक्षक बनण्याची संधी मिळो, त्यांनी पूर्वीच्या प्रशिक्षकाने केलेल्या कामापेक्षा अधिक चांगले काम करून दाखवावे इतकीच अपेक्षा आहे,” असे हरभजन म्हणाला.

“भारतीय संघाचे प्राशिक्षकपद ही पूर्णवेळ जबाबदारी आहे आणि तेवढा वेळ मी देऊ शकणार नाही. आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्यांची काळजी घेणे याला माझे प्राधान्य राहील. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा स्वत:हून मी प्रशिक्षकपदासाठी तयार असल्याचे सांगेन,” असे हरभजनने सांगितले.

दरम्यान, भारतीय संघ टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. विराट कोहली कागदपत्रांशी निगडीत कामामुळे ३१ तारखेपर्यंत तेथे पोहचेल. भारतीय संघाने सरावाला प्रारंभ केला असून १ तारखेला ते बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहेत. भारताकडून यंदा सर्वांना जेतेपदाची आशा असून त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस