Photo : X
क्रीडा

Wimbledon 2025 : विम्बल्डन जिंकणे हे माझे स्वप्न, जेतेपद पटकावल्यानंतर सिनरने व्यक्त केली भावना

विम्बल्डन जिंकणे हे माझे स्वप्न होते. माझ्यासाठी हे विजेतेपद खूप महत्त्वाचे आहे, अशा भावना इटलीचा अग्रमानांकित यानिक सिनरने विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावल्यानंतर रविवारी रात्री व्यक्त केल्या.

Swapnil S

लंडन : विम्बल्डन जिंकणे हे माझे स्वप्न होते. माझ्यासाठी हे विजेतेपद खूप महत्त्वाचे आहे, अशा भावना इटलीचा अग्रमानांकित यानिक सिनरने विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावल्यानंतर रविवारी रात्री व्यक्त केल्या.

बहुप्रतीक्षित विम्बल्डनच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना रविवारी रात्री उशीरा संपला. या सामन्यात अग्रमानांकित सिनरने द्वितीय मानांकित गतविजेत्या कार्लोस अल्कराझवर ४-६, ६-४, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. पहिला सेट हातून निसटल्यानंतरही सिनरने पुढील तीन सेटमध्ये बाजी मारत कारकीर्दीतील पहिल्या विम्बल्डन विजेतेपदावर मोहोर उमटवली. या विजयामुळे प्रतिस्पर्धी अल्कराझवर फ्रेंच ओपनमधील पराभवाची परतफेड करण्यात सिनरला यश आले. जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूविरुद्ध सतत पराभूत होत असता तेव्हा त्याच्याविरुद्ध जिंकणे सोपे नसते, असे सिनर म्हणाला.

अल्कराझविरुद्ध सलग पाच सामन्यात सिनरचा पराभव झाला होता. त्यात गेल्या महिन्यातील फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्याचा समावेश होता. फ्रेंच ओपनचा अंतिम सामना तब्बल ५ तास २९ मिनिटे चालला. कार्लोस हा मोठा खेळाडू आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे आदराने पाहतो. मात्र मी तयार आहे, कारण पुन्हा आम्ही दोघे कोणत्या तरी स्पर्धेत आमनेसामने येऊ, असे सिनर म्हणाला.

२४ ऑगस्टपासून न्यूयॉर्कमध्ये यूएस ओपनला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकमेकांना भिडू शकतात. तिथेही हे दोन खेळाडू पहिला आणि दुसरा मानांकित असतील. त्यामुळे ते फक्त अंतिम फेरीतच भिडू शकतात.

सिनरसोबत स्पर्धा करणे हे खूप विशेष आहे. प्रत्येक वेळी आम्ही दोघे एकमेकांविरुद्ध खेळतो तेव्हा आमच्या खेळाची पातळीही उंच होते, असे अल्कराझ म्हणाला. दरम्यान, अशा पातळीचा खेळ मला इतर कोणत्याही खेळाडूंमध्ये दिसत नसल्याचे अल्कराझ म्हणाला. ही स्पर्धा मला प्रत्येक दिवशी १०० टक्के देण्यास भाग पाडते. त्यामुळे माझा खेळ उंचावतो, असे अल्कराझ म्हणाला.

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

उमर खालीद, शरजील इमाम यांना जामीन नाकारला; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

ट्रम्प औषधांवर २०० टक्के टॅरिफ लावणार; अमेरिकेतील औषधांच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता