विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सेरेना सलामीला गारद; जोकोव्हिच तिसऱ्या फेरीत (Photo-X)
क्रीडा

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सेरेना सलामीला गारद; जोकोव्हिच तिसऱ्या फेरीत

विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत गुरुवारी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला. तर पुरुषांमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने तिसरी फेरी गाठली.

Swapnil S

लंडन : विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत गुरुवारी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला. तर पुरुषांमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने तिसरी फेरी गाठली.

गतविजेत्या सिनरने नुनो बोर्गेसवर ७-६ (७-४), ७-६ (७-२), ६-४ अशी मात केली, तर मेदवेदेवने स्पेनच्या अग्युलरवर ३-६, ६-३, ७-५, ६-२ अशी पिछाडीवरून चार सेटमध्ये सरशी साधली. यंदा कार्लोस अल्कराझ दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी न झाल्याने सिनरला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याच्या मार्गात अलेक्झांडर झ्वेरेव्ह, नोव्हाक जोकोव्हिच व मेदवेदेव अडथळे निर्माण करू शकतात.

दरम्यान, स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला होता तो जपानची खेळाडू नाओमी ओसाकाच्या फॅशनने आणि रॉयल बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने. यावेळी अग्रमानांकित सिनरने विजयारंभ केला. मात्र त्याला पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला. बेकहॅमची आई सिंड्रादेखील यावेळी सेंटर कोर्टवर उपस्थित होती.

पांढऱ्या रंगाच्या कपड्यांच्या कडक नियमांनंतरही ओसाका हिने ऑल इंग्लंड क्लबच्या मैदानावर आपल्या फॅशनची जादू दाखवली. ओसाकाने जॅकइमोटविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यासाठी कोर्ट क्रमांक तीनवर प्रवेश केला, तेव्हा तिने किमोनोसारखा वाहता रोब परिधान केला होता. या कपड्याला लटकणारे हात आणि त्यावर भरतकाम करण्यात आले होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड