क्रीडा

विंडीजचा क्रिकेटपटू ॲलनला आफ्रिकेत हॉटेलबाहेर दरोडेखोरांनी लुटले, SA20 स्पर्धेदरम्यानचा प्रकार

ॲलनला यामध्ये कोणतीही दुखापत झालेली नाही. यासंबंधीची माहिती पॉल रॉयल्स संघाने दिलेली आहे.

Swapnil S

केपटाऊन : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू फॅबियन ॲलनला दक्षिण आफ्रिकेत बुंदकीच्या धाकावर लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. ॲलन हा सध्या आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये पार्ल रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र या प्रकरणामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२५ जानेवारी रोजी जोहान्सबर्ग सुपर किंग्सविरुद्धची लढत खेळल्यानंतर २८ वर्षीय ॲलनसोबत ही घटना घडली. संघातील खेळाडू वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये परतत असताना ॲलनला काही दरोडेखोरांनी अडवले व त्याचा मोबाईल, बॅग, घड्याळ यांसह काही वैयक्तिक चैनीच्या वस्तू हिसकावल्या. ॲलनला यामध्ये कोणतीही दुखापत झालेली नाही. यासंबंधीची माहिती पॉल रॉयल्स संघाने दिलेली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने याविषयी माफी मागतानाच सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी