क्रीडा

मुंबई शहरच्या दोन्ही संघांची विजयी सलामी! महिलांमध्ये पुणे, पालघर, कोल्हापूर यांची दमदार सुरुवात; पुरुषांमध्ये यजमान ठाण्याचा पराभव

महिलांमध्ये अ-गटात गतविजेत्या पुण्याने रत्नागिरीला ४१-२० असे नेस्तनाबूत केले. आम्रपाली गलांडे, कोमल देवकर यांनी पुण्याकडून छाप पाडली.

Swapnil S

ठाणे : २२व्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक’ वरिष्ठ पुरुष आणि महिलांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई शहरच्या संघांनी विजयी सलामी नोंदवली. त्याशिवाय महिलांमध्ये पुणे, पालघर, कोल्हापूर या संघांनीही दमदार प्रारंभ केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला प्रारंभ झाला.

मेंटल हॉस्पिटलच्या बाजूला, साठे नगर, परबवाडी, ठाणे (पश्चिम) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या अ-गटात मुंबईने कोल्हापूरला ४५-१९ अशी धूळ चारली. सिद्धेश पिंगळे, विनोद अत्याळकर यांच्या चढाया व ओमकार मोरे, सिद्धेश तटकरे यांच्या पकडींच्या बळावर मुंबईने बाजी मारली. कोल्हापूरकडून योगेश पाटील, तुषार बरगे यांनी चांगला खेळ केला. क-गटात मुंबई उपनगरने यजमान ठाणे संघावर ३३-३२ अशी सरशी साधली. ठाण्याच्या चिन्मय गुरव, परेश म्हात्रे यांच्यामुळे लढत रंगतदार झाली. अखेर आकाश गायकवाड, अलंकार पाटील यांनी उपनगरला विजय मिळवून दिला.

महिलांमध्ये अ-गटात गतविजेत्या पुण्याने रत्नागिरीला ४१-२० असे नेस्तनाबूत केले. आम्रपाली गलांडे, कोमल देवकर यांनी पुण्याकडून छाप पाडली. ब-गटात मुंबई शहरने धुळ्याचा ६२-२१ असा धुव्वा उडवला. पूजा कदम, श्रद्धा कदम, साधना विश्वकर्मा या त्रिकुटाला या विजयाचे श्रेय जाते. याव्यतिरिक्त, ड-गटात पालघरने नांदेडला ४३-२४, क-गटात रायगडने नंदूरबारला ४२-२३, अ-गटात कोल्हापूरने नागपूरला ४१-३३ असे पराभूत केले.

नाशिकच्या संघांचा विजयारंभ

महिलांच्या ड-गटात नाशिकने नागपूर ग्रामीणचा ३७-२० असा पराभव केला. पूर्वार्धात चुरशीने खेळलेल्या या सामन्यात नाशिकने पहिला लोण देत १८-१२ अशी आघाडी घेतली. नाशिकची विदिशा सोनार या विजयाची शिल्पकार ठरली. नागपूरची सोनाली राठोड चमकली. नाशिकच्या पुरुष संघाने ब-गटात वाशिमचा ६७-२५ असा फडशा पाडला. पवन भोर, ईश्वर पठाडे यांच्या झंझावाती चढाया व सनी मते याच्या भक्कम बचावाला जाते. यवतमाळचे आयुष राठोड, राहुल भैसर बरे खेळले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन