क्रीडा

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत लवलिना, निखतकडून अपेक्षा

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलिना बोर्गोहैन आणि दुहेरी जगज्जेती निखत झरीन यांच्या कामगिरीवर अवघ्या भारताचे लक्ष असणार आहे. लिव्हरपूल, इंग्लंड येथे गुरुवारपासून जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेला प्रारंभ होणार असून यामध्ये भारताचे महिला व पुरुष बॉक्सर मिळून २० खेळाडू सहभागी झाले आहेत.

Swapnil S

लिव्हरपूल : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलिना बोर्गोहैन आणि दुहेरी जगज्जेती निखत झरीन यांच्या कामगिरीवर अवघ्या भारताचे लक्ष असणार आहे. लिव्हरपूल, इंग्लंड येथे गुरुवारपासून जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेला प्रारंभ होणार असून यामध्ये भारताचे महिला व पुरुष बॉक्सर मिळून २० खेळाडू सहभागी झाले आहेत.

यंदा नव्या प्रशासकिय समितीच्या मार्गदर्शनात बॉक्सिंगची जागतिक स्पर्धा होणार आहे. यापूर्वी आयबीए म्हणजेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धांचे आयोजन केले जायचे. ४ ते १४ सप्टेंबर या काळात रंगणाऱ्या या स्पर्धेत ६५ देशांतील ५५० बॉक्सर्स सहभागी होणार आहेत. यामध्ये १७ खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेते आहेत. त्यामुळे भारताला कडवे आव्हान मिळेल.

२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या लवलिनाची त्यानंतर कामगिरी खालावली. तर निखतने जागतिक पदक जिंकल्यानंतर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिलाही अपयश आले. त्या ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगद्वारे एकही पदक जिंकता आले नाही. २०२३च्या जागतिक स्पर्धेत महिलांनी ४ सुवर्ण, तर पुरुषांनी ३ कांस्यपदके पटकावली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा जागतिक स्पर्धेत छाप पाडण्यास भारताचे बॉक्सर उत्सुक आहेत. लवलिना ७५ किलो वजनी गटात, तर निखत ५१ किलो गटात प्रतिनिधित्व करेल.

त्याशिवाय पूजा राणी (८० किलो), जास्मिन लंबोरिया (५७ किलो) यांच्याकडे लक्ष असेल. पुरुष विभागात सचिन सिवाच (६० किलो), हितेश गुलिया (७० किलो) यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.

भारताचा संघ

महिला : मीनाक्षी हुडा (४८ किलो), निखत झरीन (५१), साक्षी (५४), जास्मिन लंबोरिया (५७), संजू खत्री (६०), नीरज फोगट (६०), सनमचा चानू (७०), लवलिना (७५), पूजा राणी (८०), नुपूर शेरॉन (८०+).

पुरुष : जादुमणी सिंग (५० किलो), पवन बर्तवाल (५५), सचिन सिवाच (६०), अभिनाष जामवाल (६५), हितेश गुलिया (७०), सुमित कुंडू (७५), लक्ष्य चहर (८०), जुगनू अहलावत (८५), हर्ष चौधरी (९०), नरेंदर बेरवाल (९०+).

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार! ट्रम्प यांना आली उपरती; मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

अंजना कृष्णा धमकी प्रकरणात बावनकुळे यांचे अजितदादांना समर्थन