भारत-अ संघाचा न्यूझीलंड दौरा : यशस्वीचे दीडशतक; सामना अनिर्णित X|cricbuzz
क्रीडा

भारत-अ संघाचा न्यूझीलंड दौरा : यशस्वीचे दीडशतक; सामना अनिर्णित

भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने खराब फॉर्मला मागे टाकत न्यूझीलंड ‘अ’ विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले.

Swapnil S

ख्राइस्टचर्च : भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने खराब फॉर्मला मागे टाकत न्यूझीलंड ‘अ’ विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले. त्याच्या १५५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या डावात २ बाद २८२ धावा केल्या. अखेर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला.

सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी जैस्वालने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या १६२ चेंडूंत नाबाद १५५ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत १५ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जैस्वालने सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत.

त्याला विदर्भाचा युवा डावखुरा फलंदाज यश राठोड यानेही उत्तम साथ दिली. राठोडने १२२ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २४७ धावांची अभेद्य भागीदारी केली. राठोडने शतक पूर्ण करताच दोन्ही कर्णधारांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.

अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारत ‘अ’ची दुसऱ्या डावात बिनबाद ३२ अशी धावसंख्या होती. मात्र, सलामीवीर साई सुदर्शन (११) आपल्या आदल्या दिवसाच्या धावसंख्येत कोणतीही भर न घालता बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलला खातेही उघडता आले नाही. मात्र यशस्वीने दीडशतक साकारले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच

Mumbai : नुकसानभरपाई मालक व भाडेकरूमध्ये समान वाटून घ्या! सिद्धिविनायक मंदिर जमीन भरपाईप्रकरणी आदेश

...तर निवडणुका घ्यायच्याच कशाला? 'गोकुळ' अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांचा संताप