वीज निर्मितीबाबत २,४४८ ग्राहक स्वावलंबी संग्रहित छायाचित्र
ठाणे

वीज निर्मितीबाबत २,४४८ ग्राहक स्वावलंबी; कल्याण आणि भांडुप परिमंडळात पीएम सूर्यघर योजनेचा लाभ

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंतच्या १३ हजार ८३१ अर्जांपैकी २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे.

Swapnil S

­­­­­­डोंबिवली : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवाॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. तर शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवाॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवाॅटपर्यंत मिळते. ३ किलोवाॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवाॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवाॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरिता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवाॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवाॅट आहे.

वीज निर्मितीबाबत २,४४८ ग्राहक स्वावलंबी

महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवाॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल