ठाणे

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ५ शाळा अनधिकृत ; शिक्षण विभागातर्फे यादी जाहीर

नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने हद्दीतील ५ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी १७ मे रोजी जाहीर केली

प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी महापालिका कधी प्रसिध्द करणार याकडे लक्ष लावून असलेल्या पालकवर्गाची चिंता अखेर मिटली आहे. नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने हद्दीतील ५ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी १७ मे रोजी जाहीर केली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दिनांक ३१ मार्च अखेर प्राथमिक शाळा शासनाची, नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम २००९ मधील कलम-१८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. त्यानुसार, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५ शाळा मान्यतेशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महारपालिका शिक्षण विभागाने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या स्वाक्षरीने जाहीर प्रकटन प्रसिध्द केले असून, शाळा तात्काळ बंद करावी, असे जाहीर केले आहे.

दरम्यान, संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महापालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे. तसेच परवानगी शिवाय सुरु केलेली शाळा तात्काळ बंद करावी, अन्यथा त्यांच्याविरुध्द बालकांचा मोफत-सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे महापालिका शिक्षण विभागामार्फत सूचित करण्यात आले आहे.

सदर अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करुन नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा. जेणेकरुन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आवाहन करण्यात येत आहे.

- राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका

'या' आहेत शाळा

- मुंबई अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, सीबीडी-बेलापूर.

- आग्रीपाडा इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब, नेरुळ.

- द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ.

- किसननगर सरस्वती विद्यानिकेतन स्कुल, घणसोली.

- ऐरोली इलिम इंग्लिश स्कुल, रबाळे

Mumbai : 'जय हो' बंद होणार? ब्रिच कँडी रहिवाशांच्या तक्रारीनंतर 'मेलोडी रोड' बंद करण्याचा निर्णय

Mumbai-Pune Expressway : 'प्रत्येक विकेंडला हीच दशा'; लोणावळ्यात महामार्गावर भीषण कोंडी, प्रवाशांचा उद्रेक

Mumbai : मिठीतील गाळ उपशाला वेग! ४ एप्रिलपासून वेगाने होणार काम; ९ लाख मेट्रिक टन गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट

४८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील 'रत्न भांडार' उघडले; दागिन्यांच्या मोजमापास सुरुवात

राज्याचे तापमान वाढणार; उष्ण व दमट हवामान; विजांसह पावसाची शक्यता