ठाणे

गणपत गायकवाडांच्या निकटवर्तीयाला अटक, अन्य दोघांच्या शोधासाठी पथके रवाना

विकीच्या तपासातून आणखी काय नवीन माहिती समोर येते, हे पहावे लागणार आहे. आमदार पुत्रासह इतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सहा पोलीस पथके शोध मोहिम घेत आहेत.

Rutuja Karpe

उल्हासनगर : शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी फरार तीन आरोपींपैकी आमदार गणपत गायकवाड यांचा निकवर्तीय असलेला दिवेश उर्फ विकी गणोत्रा याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. विकीच्या तपासातून आणखी काय नवीन माहिती समोर येते, हे पहावे लागणार आहे. आमदार पुत्रासह इतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सहा पोलीस पथके शोध मोहिम घेत आहेत.

हिललाईन पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात महेश गायकवाड याच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मंगळवारी या घटनेची दुसरी चित्रफीत समोर आली असून, यातील गोळीबाराच्या प्रसंगी हाणामारीत सहभागी असलेल्या आणखी काही आरोपींना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर मंगळवारी रात्री फरार आरोपींपैकी कल्याण पश्चिमेतील सुंदरनगर येथे राहणारा दिवेश उर्फ विकी गणोत्रा याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यामुळे आमदार पुत्र वैभव गायकवाड आणि नागेश बढेकर हे देखील लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील, असेही पोलिसांनी सांगितले.

महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार होण्याच्या काही सेकंद अगोदर आमदार पुत्र वैभव गायकवाड आणि विकी गणोत्रा हे वरिष्ठ पोलीस निरिक्षकाच्या दालनातून बाहेर गेले होते. त्यामुळे प्रमुख सहा आरोपींमध्ये त्याचाही समावेश आहे. तसेच विकी गणोत्रा हा आमदार गायकवाड यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासोबतचे विकी गणोत्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश