ठाणे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भधारणेनंतर दोन जणांना अटक, तर एक जण फरार

काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत आजी-माजी आमदारांच्या बांधकाम प्रकल्प साईटवर १४ वर्ष ११ महिन्याच्या मुलीवर बळजबरीने वारंवार तिघांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला.

Swapnil S

भाईंंदर : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत आजी-माजी आमदारांच्या बांधकाम प्रकल्प साईटवर १४ वर्ष ११ महिन्याच्या मुलीवर बळजबरीने वारंवार तिघांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्यामुळे काशीगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एका आरोपीला महिनाभरापूर्वी अटक करून कोठडी सुनावली आहे, तर दुसऱ्या आरोपीला अटक केली असता तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांची अपना घर बांधकाम प्रकल्पात आणि मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या बांधकाम प्रकल्पात पीडितेचे आईवडील काम करत होते. त्याच ठिकाणी असलेल्या तिन्ही आरोपींनी अल्पवयीन पीडितेला वेगवेगळ्या बांधकाम साईटवर घेवून जात बळजबरीने शरीर संबंध ठेवले होते, तसेच त्याच आरोपीने पुन्हा दोन दिवसाने पीडितेसोबत बाथरुममध्ये तर आरोपी धिरज पासवानने बळजबरीने शरीर संबंध निर्माण केले. आरोपी पासवानने सदर बाब कोणास न सांगण्याची धमकी देखील दिली. पीडिता दोन महिन्याची गरोदर राहिल्यानंतर घटना उघडकीस आली त्यानंतर धीरज पासवानला अटक केली. तर किसन दुबेला पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी एक आरोपी फरार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी