ठाणे

मनसेच्या दणक्यानंतर पोलिसांकडून नमाज पठणाचे साहित्य जप्त

अविनाश जाधव यांनी आपले कार्यकर्ते आणि स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन सदर ठिकाणी धाड टाकली.

Swapnil S

ठाणे : घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा परिसरात असलेल्या एमएमआरडीएच्या काही इमारती आहेत. विस्थापितांना आसरा मिळावा यासाठी एमएमआरडीएने उभारलेल्या इमारतीमध्ये स्पीकर लावून चक्क नमाज पडली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी पोलिसांनी स्पीकर आणि इतर साहित्य ताब्यात घेतले आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रकल्प विस्थापित बधिताना कुटुंबांना घोडबंदर येथील एमएमआरडीएच्या इमारतीत घरे दिली जातात. सध्या काही इमारती रिकाम्या असून एका इमारतीतून चक्क अजानचे आवाज सुरू झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. दिवसातून तब्बल तीन वेळा स्पीकरवरून अजान दिली जात होती. तिथे अनेकांचे येणेजाणे असल्याचे निदर्शनास येताच काही स्थानिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे तक्रार केली.

अविनाश जाधव यांनी आपले कार्यकर्ते आणि स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन सदर ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी पोलिसांनी चौकशी केली व तिथे लावलेला स्पीकर ताब्यात घेतला. मुंब्र्यातून आलेल्या काही विस्थापित कुटुंबांनी हा प्रकार सुरू केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. मशिदींवर लावलेल्या भोंग्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना देखील असे प्रकार घडतात त्यामुळे पोलिसांनी या विरोधात कडक कारवाई करावी अन्यथा पुढच्या वेळी मनसेस्टाइलने दणका देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस