(संग्रहित छायाचित्र)
ठाणे

नोंदणीकृत फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास आंदोलन; हक्काची जागा देण्याची मागणी; सततच्या कारवाईवर नाराजी

डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनाकडून सातत्याने कारवाई होत आहे. यावर नोंदणीकृत फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त करत आम्हाला हक्काची जागा द्यावी अशी मागणी केली आहे.

शंकर जाधव

डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनाकडून सातत्याने कारवाई होत आहे. यावर नोंदणीकृत फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त करत आम्हाला हक्काची जागा द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर अनधिकृत फेरीवाल्यांबरोबर नोंदणीकृत फेरीवाल्यांवर देखील कारवाई होत असल्यामुळे या कारवाया थांबविण्याची मागणी करत पालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील 'फ' प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त संजय कुमावत, फेरीवाला अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अरुण जगताप, कर्माचारी वर्ग यांनी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे. नागरिकांना व्यवस्थित चालता यावे, याकरिता फुटपाथवरील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण देखील हटविण्यात आले आहे. मात्र याचा फटका नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पालिका प्रशासनाने नोंदणीकृत फेरावाल्यांना हक्काची जागा देणे, बंधनकारक असताना देखील दिली जात नसल्यामुळे फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त करत पालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फ’ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त संजय कुमावत हे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत.

फुटपाथवरील अतिक्रमण हटविल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे तर दुसरीकडे पालिकेच्या या कारवाईला फेरीवाला संघटनेने विरोध दर्शविला आहे. पालिकेमार्फत होणाऱ्या कारवाईमुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

नऊ हजार नोंदणीकृत फेरीवाले

डोंबिवली पश्चिम विभाग रेल्वे स्टेशनजवळील दीडशे मीटरपेक्षा जास्तचा परिसर पूर्णपणे फेरीवाला मुक्त झाला आहे. भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगरसेविका मनीषा धात्रक आणि पालिकेचे फेरीवाला अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख विजय भोईर यांच्या पाठपुराव्याने ते शक्य झाले. डोंबिवली पश्चिमेकडील काही फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तर डोंबिवली पूर्वेकडील फेरीवाल्यांची संख्या अफाट असून फक्त नऊ हजार नोंदणीकृत फेरीवाले आहेत.

नियमानुसार नोंदणीकृत फेरीवाल्यांना पालिका प्रशासनाने बसण्यास जागा देणे बंधनकारक आहे. मात्र तसे न करता अन्यायकारक कारवाई सुरू आहे. पालिका प्रशासनाने कारवाई थांबवून नोंदणीकृत फेरीवाल्यांना हक्काची जागा द्यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच कारवाई न थांबल्यास लवकरच पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.

- बबन कांबळे,अध्यक्ष कष्टकरी होकर्स व भाजी विक्रेता युनियन

पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे. पालिका प्रशासन अन्यायकारक कारवाई करत नाही. फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले नाही तर कारवाई होणार नाही. मात्र स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाले बसल्यास कारवाई नक्की होणार. फुटपाथवर अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करू, असा इशारा दुकानदारांना देण्यात आला आहे.

संजय कुमावत, सहाय्यक आयुक्त 'फ' प्रभाग क्षेत्र

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला वेग; जपानमध्ये भारतीय लोको पायलटांचे विशेष प्रशिक्षण, Video व्हायरल

प्रसाधनगृहाच्या दारावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा? हरयाणातील संतापजनक प्रकार, नेटकरी भडकले; Video व्हायरल

JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक, धावपळीत अनेकजण जखमी

ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला

पुणे : भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात भीषण आग; ५० हून अधिक गाड्या जळून खाक, Video