ठाणे

डोंबिवलीत ३३० भटक्या श्वानांना अँटी रेबीजची लस

गेल्या वर्षी सुमारे ३५०० भटक्या श्वानांना लास देण्यात आली. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Swapnil S

डोंबिवली : रेबिजचा रोग हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने होतो. या भयानक रोगाविषयी लोकजागृती व्हावी तसेच त्याचे बळी ठरणारे प्राणी आणि मानव यांच्यावर इलाज करण्यासाठी 'एकच औषध' उपलब्ध असावे, या हेतूने २००७ पासून जागतिक रेबीज दिवस म्हणून पाळला जातो. रेबिजच्या रोगाला अटकाव व्हावा आणि तो टाळावा म्हणून जगभर प्रयत्न सुरू आहेत. एकत्रित येऊन रेबिजला भूतकाळात गाडा या सूत्राने विश्व रेबीज दिनाचे सोहळे आयोजित केले जातात. रेबीज हा रोग बरा होतो, तरीही जगभरात दर दहा मिनिटाने एक पेशंट या रोगाने बाधित होऊन मृत्युमुखी पडतो. दरवर्षी जगभरात ५२,५६० जण रेबीजमुळे दगावतात. यात मुख्य वाटा १५ वर्षे वयोगटाखालील मुलांचा अधिक आहे. लस न टोचलेले कुत्रे मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो आणि या लसीकरणाकडे जगभरात सर्रासपणे दुर्लक्ष होते. कारण या औषधाची किमत गरीबांना परवडणारी नसते. डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये रेबीज प्रतिबंधक लसीकरण आयोजित केली गेली. सुमारे ३०० च्यावर भटक्या जनावरांना ही लस टोचण्यात आली.

गेल्या वर्षी सुमारे ३५०० भटक्या श्वानांना लास देण्यात आली. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. दर पंधरा दिवसांनी पॉजचे कार्यकर्ते कॉलनीमध्ये फिरून ही मोहीम राबवत असतात आणि याची सुरुवात २००१ मध्ये झाली. ही मोहीम गेली २४ वर्षे पॉज अविरत चालवत आहे आणि याचमुळे कल्याण-डोंबिवली शहरात एकही व्यक्तीचा मृत्यू रेबीजमुळे नोंदविला गेलेला नाही.

- अनुराधा रामस्वामी, संस्थापक पॉज

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव