Badlapur : भटक्या श्वानांच्या दहशतीने विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; प्रशासनाविरोधात तीव्र संताप  
ठाणे

Badlapur : भटक्या श्वानांच्या दहशतीने विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; प्रशासनाविरोधात तीव्र संताप

भटक्या श्वानांनी पाठलाग केल्याने जीव वाचवण्यासाठी धावताना बारावीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बदलापुरात घडली आहे. हर्षल शिंदे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो बदलापूर पश्चिमेतील मोहनानंद परिसरात राहत होता.

Swapnil S

बदलापूर : भटक्या श्वानांनी पाठलाग केल्याने जीव वाचवण्यासाठी धावताना बारावीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बदलापुरात घडली आहे. हर्षल शिंदे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो बदलापूर पश्चिमेतील मोहनानंद परिसरात राहत होता. या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या नगरपरिषद प्रशासनाविरोधात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेला हर्षल शिंदे गुरुवारी दुपारच्या सुमारास शिकवणी सुटल्यानंतर मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेतील शनी नगर परिसरातून घरी चालला होता. यावेळी अचानक भटक्या श्वानांची एक टोळी त्याच्या मागे लागली. श्वानांच्या हल्ल्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हर्षल वेगाने पळत सुटला. काही अंतर धावल्यानंतर तो एका दुकानात शिरला. दुकानदार महिलेला ‘श्वानांमुळे आत आलो’, असे सांगितल्यानंतर घाबरलेला हर्षल तेथेच कोसळला. दुकानदार महिलेने आणि हर्षलच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठला नाही. या घटनेची माहिती तत्काळ त्याच्या शिकवणीच्या शिक्षकांना देण्यात आली. त्यानंतर एका शाळेच्या व्हॅनमधून त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

स्त्यांवर, चौकांत, रेल्वे स्थानकात श्वानांच्या टोळ्या

भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून दरवर्षी नागरिकांच्या कराचे लाखो रुपये खर्च केले जातात. तरीही श्वानांची संख्या आटोक्यात का येत नाही, असा संतप्त सवाल बदलापूरकर विचारत आहेत. आजही रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकात भटक्या श्वानांच्या टोळ्या पाहायला मिळतात. इतकेच काय तर बदलापूर रेल्वे स्थानकातही भटक्या श्वानांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर तरी पालिका प्रशासनाला जाग येऊन भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त केला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार

डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. भटक्या श्वानांनी अचानक पाठलाग केल्यामुळे घाबरून तो पळत सुटला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा त्रास होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. ​

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

लोकसभेच्या जागा ५०% वाढणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब, आता खरी परीक्षा संसदेत

Mumbai : शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क - मुख्यमंत्री

सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजप प्रणित पॅनल विजयी

शरद पवार गटाच्या भूमिकेबद्दल उत्सुकता

अखेर मीरारोडच्या जमिनीचा सातबारा पंतप्रधानांच्या बालमित्राच्या नावावर; तब्बल १९ वर्षांचा संघर्ष यशस्वी