प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

बदलापुरातील गोळीबारात युवक जखमी; एक आरोपी अटकेत; दोघांचा शोध सुरू

बदलापूर शहरात गुरुवारी दुपारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. ही घटना आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एक आरोपी अटकेत असून दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

Swapnil S

बदलापूर : बदलापूर शहरात गुरुवारी दुपारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. ही घटना आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एक आरोपी अटकेत असून दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

घटना दुपारच्या सुमारास घडली. बोराडपाडा रस्त्यावर राहणारा अल्ताफ शेख भाजी आणण्यासाठी बाहेर पडला असता, मागून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्याच्यावर दोन राऊंड गोळीबार केला. त्यात एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली असून त्याला तत्काळ बदलापूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर बदलापूर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. मुख्य आरोपी विवेक नायडू याला अटक करण्यात आली असून त्याचे इतर दोन साथीदार अद्याप फरार आहेत. या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

गोळीबाराची घटना आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर घडल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून उल्हासनगर परिमंडळ, बदलापूर पोलीस व ठाणे गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांकडून तपास सुरू आहे. फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

घटनेनंतर अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी बदलापूर पोलीस ठाण्यास भेट दिली असून प्रकरण गांभीर्याने घेत तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, जखमी अल्ताफ शेख व आरोपी विवेक नायडू हे दोघेही एकमेकांचे पूर्वीचे मित्र असून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्या आपसातील वादातूनच ही गोळीबाराची घटना घडली असावी, अशी प्राथमिक शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याबाबतचा अंतिम तपशील पुढील तपासात उघड होणार आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक