ठाणे

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाला मारहाण; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Swapnil S

कर्जत : नेरळ येथे राहणारा आकाश पाटील हा तरुण रिक्षा चालवतो. आकाश नेरळला सीएनजी गॅस भरण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याची बहीण देखील सोबत होती. सीएनजी गॅस पंपावर वाहनात गॅस भरताना वाहन निर्मनुष्य असावे लागते. त्यामुळे आकाशने बहिणीला बाहेर उतरवून तो गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगेत थांबला. त्याचवेळी तिथे एका कारमधून दामत गावातील मुझमिल मलिक बुबेरे, फरान नासिर नजे, रियाज मो. बिलाल शेख यासह एक अल्पवयीन मुलगा देखील तेथे आले होते. रिक्षात सीएनजी भरून झाल्यानंतर आकाश आपल्या बहिणीला घेण्यासाठी गेला असता बहीण घाबरलेली दिसली. त्यानंतर तेथे दाखल झालेल्या कारमधील चौघांनी आपल्याला अश्लील इशारे केल्याचे बहिणीने आकाशला सांगितले. यावर चिडलेल्या आकाशने त्या चौघांना याबाबत जाब विचारला असता त्या चौघांनी आकाशलाच बेदम मारहाण करून पळ काढला.

जखमी झालेल्या आकाशने बहिणीसह नेरळ पोलीस ठाणे गाठत त्या चौघांविरुध्द तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत मुझमिल मलिक बुबेरे, फरान नासिर नजे, रियाज मो. बिलाल शेख यांना अटक करून न्यायलयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे हे अधिक तपास करीत आहेत.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला