खासगी बसच्या अपघातात आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; १२ जखमी छायाचित्र सौ. sumit gharat
ठाणे

खासगी बसच्या अपघातात आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; १२ जखमी

भिवंडी : पडघानजीकच्या खडवली नदीवर पिकनिकसाठी खासगी बसने गेलेल्या नागरिकांच्या बसला पडघा-वडपाजवळ शुक्रवारी रात्री उड्डाणपुलाच्या पिलरला बस धडकल्याने झालेल्या अपघातात एका आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत.

Swapnil S

भिवंडी : पडघानजीकच्या खडवली नदीवर पिकनिकसाठी खासगी बसने गेलेल्या नागरिकांच्या बसला पडघा-वडपाजवळ शुक्रवारी रात्री उड्डाणपुलाच्या पिलरला बस धडकल्याने झालेल्या अपघातात एका आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. ज्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

शहरातील गैबी नगर, फंडोले नगर परिसरातील नागरिक खासगी बसने पडघानजीकच्या खडवली नदीवर पिकनिकसाठी गेले होते. सायंकाळी पिकनिकहून परत येत असताना बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपा पडघाजवळील उड्डाणपुलाच्या पिलरला बस धडकली. या धडकेत आठ वर्षांच्या कायनात अन्सारी या चिमुरडीचा मृत्यू झाला असून तरन्नुम अन्सारी, वकार अन्सारी, तसबिया, नजमा अन्सारी, खुशी अन्सारी, शमा परवीन, काफिया अन्सारी, नमिरा, केहकशा व बदरुद्दीन अन्सारी या जखमी झाल्या आहेत.

त्यापैकी बदरुद्दीन अन्सारी यास पुढील उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन अपघाता संदर्भात माहिती घेतली व जखमींना योग्य व आवश्यक त्या आरोग्य सुविधा तत्काळ देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

शिर्डी-तिरुपती प्रवास होणार सोपा; दोन्ही मार्गांवर १८ विशेष फेऱ्या, एकूण २८ ठिकाणी थांबे