Bhiwandi : रिक्षातून तब्बल १७ शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक; Video व्हायरल, कारवाईची मागणी 
ठाणे

Bhiwandi : रिक्षातून तब्बल १७ शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक; Video व्हायरल, कारवाईची मागणी

भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरात एका रिक्षातून तब्बल १७ शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

भिवंडी : भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरात एका रिक्षातून तब्बल १७ शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन बाग परिसरात एमएच ०४ एचझेड ८६८० क्रमांकाच्या रिक्षातून १७शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबून शाळेत नेले जात असल्याचे एका सजग नागरिकाच्या निदर्शनास आले. या नागरिकाने तत्काळ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला. तसेच रिक्षाचालकाला याबाबत जाब विचारल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, रिक्षाचालकाने संबंधित नागरिकाची माफी मागितल्याचेही दिसते.

शहरात वाहतूक पोलिसांकडून विविध वाहनांवर कारवाई केली जात असली, तरी शाळकरी विद्यार्थ्यांची अशा प्रकारे धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रिक्षामध्ये बसवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चालकावर वाहतूक पोलीस प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Thane : पितृपक्षात तर्पण विधी महागले; सामान्यांच्या आवाक्याबाहेर दक्षिणा, कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी

उरण : जेएनपीए बंदरावर तीन कोटींचे बेकायदेशीर फटाके जप्त; DRI च्या अधिकाऱ्यांची कारवाई, मुख्य संशयिताला अटक

Thane : शनिवारी काही भागातील पाणीपुरवठा बंद

Bhiwandi : नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखीव

Karjat : रूळ ओलांडताना एक्स्प्रेसची धडक; प्रवाशाचा मृत्यू, कर्जत रेल्वे पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद