ठाणे

भिवंडीत चिमुरडीची हत्या करणारा अटकेत; पोलिसांनी ५ तासांत आवळल्या मुसक्या

सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्याच्या गुन्ह्यात अटक झालेला व नंतर न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला सलामत अन्सारी (३४) या विकृत आरोपीने पुन्हा एकदा तसाच घृणास्पद प्रकार घडवून सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे.

Swapnil S

भिवंडी : सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्याच्या गुन्ह्यात अटक झालेला व नंतर न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला सलामत अन्सारी (३४) या विकृत आरोपीने पुन्हा एकदा तसाच घृणास्पद प्रकार घडवून सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट होऊन अवघ्या पाच तासांत आरोपीला भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतून पकडले. त्यानंतर त्याचा ताबा निजामपूर पोलिसांकडे सोपवण्यात आला असून न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

सात वर्षीय चिमुरडी शौचासाठी बाहेर गेल्यानंतर बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. नजीकच्या चाळीतील बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर प्लास्टिकच्या गोणीत तिचा मृतदेह सापडला.

पाच पोलीस निलंबित

दरम्यान, या आरोपीला यापूर्वी १३ सप्टेंबर २०२३ रोजीही अशाच पद्धतीने सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक झाली होती. मात्र, ४ ऑगस्ट २०२५ रोजी भिवंडी न्यायालयात हजेरीसाठी आणल्यावर तो पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला होता. या प्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

प्रजासत्ताक दिनापूर्वी पंजाब पोलिसांनी उधळला मोठा दहशतवादी कट; RDX सह ४ दहशतवाद्यांना अटक

सोलापूरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र; राष्ट्रवादींच्या दोन्ही गटांचीही हातमिळवणी; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबईचा महापौर भाजपचाच, नाहीतर विरोधी पक्षात बसू! सुधीर मुनगंटीवार यांचा शिंदेसेनेला थेट इशारा

मुंबईत बिहार भवन बांधणारच! "राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का?"; बिहारच्या मंत्र्यांनी डिवचलं

तिरुवनंतपुरम महापालिकेचा दणका; भाजपला ठोठावला १९.७ लाखांचा दंड