ठाणे

Bhiwandi : बांधकामग्रस्त इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून प्लायवूड डोक्यावर कोसळले; मजुराचा दुर्दैवी मृत्यू, कामगारांमध्ये संताप

चौथ्या मजल्यावरील मोठी प्लायवूड शीट अचानक घसरून खाली उभ्या असलेल्या कामगारांवर कोसळली. ही शीट थेट फुलसर यांच्या डोक्यावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले.

Krantee V. Kale

भिवंडी : टेमघरपाडा परिसरातील अरिहंत सिटी फेज-२ जवळ सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीच्या बांधकामस्थळी बुधवारी दुपारी भीषण अपघात घडला. चौथ्या मजल्यावरून जड प्लायवूड शीट खाली कोसळून बिहारमधील २५ वर्षीय स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त कामगारांनी ठेकेदाराविरोधात निषेध आंदोलन करत सुरक्षा उपाययोजनांकडे गंभीर दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला.

मृत मजुराचे नाव फुलसर हारून शेख (२५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीवर स्लॅब सेंटरिंग काढण्याचे काम सुरू असताना चौथ्या मजल्यावरील मोठी प्लायवूड शीट अचानक घसरून खाली उभ्या असलेल्या कामगारांवर कोसळली. ही शीट थेट फुलसर यांच्या डोक्यावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले. सहकारी कामगारांनी त्यांना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आयजीएम उपजिल्हा रुग्णालय बाहेर मोठ्या संख्येने कामगार जमले आणि ठेकेदार तसेच बांधकाम व्यावसायिकांविरोधात आंदोलन छेडले. बांधकामस्थळी मूलभूत सुरक्षा उपाययोजनांचा पूर्णपणे अभाव असल्याचा आरोप करण्यात आला.

वरच्या मजल्यांवर धोकादायक काम सुरू असतानाही सेफ्टी नेट बसवण्यात आले नव्हते, तसेच अनेक कामगार हेल्मेट आणि इतर सुरक्षासाहित्याविना काम करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

आजचे राशिभविष्य, १९ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

विदेशी निधीचा खेळ,एफसीआरएची लढाई

Shravan Special Recipe : उपवासाचा नवा बेत! वाटीभर साबुदाण्यांपासून बनवा खुसखुशीत थालीपीठ; रेसिपी आताच नोट करा

Shravan Special : उपवासाचा थकवा मिनिटांत होईल गायब; एनर्जी वाढवण्यासाठी प्या 'हे' खास ड्रिंक

सतत थकवा अन् विनाकारण वजन कमी होतंय? शरीराच्या 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका