हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल 
ठाणे

Bhiwandi : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

पतीसह सासरच्यांनी विवाहितेला हुंड्यात चारचाकी गाडी न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करण्यासह मारहाण करून सासरी नांदवण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Swapnil S

भिवंडी : पतीसह सासरच्यांनी विवाहितेला हुंड्यात चारचाकी गाडी न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करण्यासह मारहाण करून सासरी नांदवण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह चौघांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती जलालउद्दीन गुलाम हुसेन शेख, सासू मेरुनिसा मोहम्मद शेख, सासरे गुलाम हुसेन मोहम्मद शेख, जेठ यासुहिन शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा १० नोव्हेंबर २०२१ रोजी जलालउद्दीन याच्याशी विवाह झाला.

चारचाकीसाठी शिवीगाळ

सासरच्या मंडळींनी माहेरहून हुंड्यात कमी पैसे दिले म्हणून आणि चारचाकी गाडी दिली नाही. त्यामुळे पीडितेला टोमणे मारून शिवीगाळ व मारहाण करून मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे तिने पोलिसांत धाव घेतली.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट