Freepik
ठाणे

Bhiwandi : सिगारेट मागितल्याच्या रागातून मित्राला भोकसले

भिवंडीत तीन मित्रांपैकी एका मित्राने दुसऱ्या मित्राकडे सिगारेटची मागणी केल्याच्या रागातून दोन मित्रांनी आपसात संगनमत करून मित्राला धक्काबुक्की करीत चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

Swapnil S

भिवंडी : तीन मित्रांपैकी एका मित्राने दुसऱ्या मित्राकडे सिगारेटची मागणी केल्याच्या रागातून दोन मित्रांनी आपसात संगनमत करून मित्राला धक्काबुक्की करीत चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील एसटी स्टँड परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोन मित्रांविरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिल मकबूल शेख आणि त्याचा मित्र शहेबाज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर मोहसिन महेबूब खान असे चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मोहसिन हा निजामपुरा परिसरात राहत असून आरोपी मित्र शांतीनगरमध्ये राहत आहेत. दरम्यान ३ नोव्हेंबर रोजी साडेअकराच्या सुमारास हे तिघेही एसटी स्टँड परिसरात सिगारेट पिण्यासाठी गेले असता मोहसिनने आदिलकडे सिगारेटची मागणी करताच या रागातून आदिल आणि शहेबाजने आपसात संगनमताने मोहसिनला धक्काबुक्की केली. त्यानंतर शहेबाजने मोहसिनवर चाकूहल्ला करून त्यास गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी मोहसिनच्या फिर्यादीवरून आदिल आणि शहेबाजच्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि (गुन्हे) जाधव करीत आहेत.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी