ठाणे

Bhiwandi : लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर अत्याचार; प्रियकराला अटक

पीडित प्रेयसी काल्हेर येथील एका सोसायटीत राहत असून तिचा प्रियकर काल्हेरमधील दुसऱ्या एका सोसायटीत राहत आहे.

Swapnil S

भिवंडी : १९ वर्षीय प्रियकराने १५ वर्षीय प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार देऊनही प्रियकराने प्रेयसीवर जबरी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नारपोली पोलीस ठाणे हद्दीतून समोर आली आहे. याप्रकरणी प्रेयसीच्या फिर्यादीवरून प्रियकरावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित प्रेयसी काल्हेर येथील एका सोसायटीत राहत असून तिचा प्रियकर काल्हेरमधील दुसऱ्या एका सोसायटीत राहत आहे. दरम्यान या दोघांमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये जवळीक निर्माण होऊन प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर प्रेमसंबंधातून प्रियकराने प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली असता प्रेयसीने त्यास नकार दिला. त्यानंतर प्रेयसीला आरोपी प्रियकराने त्याच्या घरी बोलावून तिच्यावर इच्छेविरुद्ध जबरीने अत्याचार केला.

दरम्यान, याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून प्रथम दादर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी सदर गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी रात्री प्रियकराला अटक केली आहे. पुढील तपास सपोनि गणेश वाडणे करीत आहेत.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश