प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Bhiwandi : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

भिवंडी : भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पहिल्या घटनेत चाळीत राहणाऱ्या रुपेशकुमार यांची १७ वर्षे ६ महिने वयाची बहीण मैत्रिणीकडे जाऊन येते, असे आईला सांगून घराबाहेर पडली. मात्र, ती घरी परतली नाही. अखेर शांतीनगर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत ब्रह्मानंद नगर, कामतघर परिसरातील १७ वर्षे १० महिने वयाची अल्पवयीन मुलगी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली. बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने तिच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO

Mumbai : बाप्पाच्या विसर्जनापूर्वी खड्डेमुक्त रस्ते होणार; महापौरांचे समन्वय समितीला आश्वासन

वाहतूककोंडीवर ‘स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’चा पायलट प्रोजेक्ट; गुगल मॅप्सवर कोंडी दिसताच उल्हासनगर वाहतूक पोलिसांची घटनास्थळी धाव

वसईत आजपासून तीन वाढीव न्यायालये कार्यान्वित; आणखी पाच-सहा कंटेनर कोर्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न

दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये नेणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा